हतबलता !

0 4

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या संख्येने लोक मृत पावत आहेत ती संख्या हादरवून टाकणारी आहे . त्यामुळे सर्व जण भीतीच्या सावटाखाली वावरू लागले आहेत . कारण कोरोना केव्हा कुणाचा बळी घेईल हे सांगता येत नसल्याने खबरदारी घेतली जात आहे . कारण कोरोनाच्या रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत . काहींना तर रुग्णालयाच्या पायरीवरच मृत्यू येत आहे . कारण देशातील असे एकही रुग्णालय नाही की तेथे सहज बेड मिळेल . त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागलेला असतो . अशा परिस्थितीत सरकारकडून उपाय केले जात आहेत मात्र तरीही ते कमी पडत आहेत . कारण ज्या संख्येने वैद्यकीय सुविधा हव्या असतात त्या नाहीत ही खरी वस्तुस्थिती आहे . त्यामुळेच ठिकठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारली जात आहेत . मात्र त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी लागणारे वैद्यकीय पथक कमी पडत असल्याने असे रुग्णालय उभारून देखील उपचार होतील हे सांगता येत नाही . त्यामुळेच सरकार देखील हतबल झाले असल्याने पाहायला मिळत आहे . अशीच हतबलता न्यायालयानेही व्यक्त केली आहे . कारण याबाबत नवी दिल्लीसह काही ठिकाणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत . त्याच्या सुनावणीत सरकारला कठोर बोल सुनावण्यात आले आहे . त्यात काहीही करा पण रुग्णांना वेळेवर उपचार करा असा सल्ला वजा आदेश न्यायालयाने दिला आहे . मात्र तरीही वेगाने रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकार काहीही करू शकत नाही हे वास्तव आहे . त्यामुळेच नवी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने तर अक्षरशः रडत रडत व्यवस्था कथन केली . हाच प्रकार दिल्लीच्या न्यायालयात घडला . तेथेही एका ज्येष्ठ वकिलाला रडू आवरता आले नाही . कारण कोरोनाच्या रुग्णांना रुग्णलयात दाखल करण्यासाठी लोक ज्या पद्धतीने धडपडत आहेत ते फावले जात नाही . लोकांचा हा आक्रोश तर मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे . अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी आणि सर्व स्टाफ हा रात्र न दिवस काम करीत आहे . त्यातूनच त्यांनाही कोरोनाची लागण होत असून त्यांना देखील उपचार मिळतील याची खात्री नाही . कारण सर्व बेड फुल असल्याने डॉक्टरांना देखील बेड मिळत नाही याच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत . अशी परिस्थिती निर्माण होणार याची कुणीही कल्पना केली नव्हती . मात्र हे चित्र देशात निर्माण झाले आहे . त्यामुळे हा प्रकार थांबणार केव्हा आणि दिलासा मिळणार केव्हा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . अशात लस आली असल्याने लसीकरणाची मोहीम आजपासून राबविली जाणार असल्याने हाच एक अशेच किरण दिसू लागला आहे . मात्र हे लसीकरण कशा पद्धतीने राबविले जाते हाही प्रश्नच आहे . कारण लस साठा पुरेशा प्रमाणात नसल्याचे सांगितले जात असल्याने लोक चिंतेत पडले आहेत . ही चिंता केवळ लोकांनाच नाही तर सरकारलाही आहे . म्हणून लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच हतबलता दूर होईल असे दिसते .

Leave A Reply

Your email address will not be published.