लढा सुरूच राहील

0 3

अफगाणिस्थानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथे  शांतता नांदेल  कुणालाही वाटत नाही . कारण अमेरिकेने अफगाणिस्थानातून माघार घेतली असली तरीही अमेरीकेचे लक्ष  अफगाणिस्थानवर कायम  राहील . तसेच तालिबान्यांना सर्वच अफगाणी जनतेचा पाठिंबा आहे असेही नाही . त्यातून अफगाणिस्थानात तालिबान्यांविरुद्ध वातावरण निर्माण होत राहील . अशा परिस्थितीत काबूल विमानतळावरील हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरीकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे . त्यातूनच पुन्हा युद्ध पुकारले जाईल की काय असे वाटू लागले आहे . कारण अमेरिका सहजासहजी हार मंदिरी नाही , या अनुभव येत असतोच . तशात  गेल्या दोन दशकात अफगाणमध्ये अमेरिकेने शेकडो सैनिक गमावले आहेत. मात्र, तरीही अमेरिकेला संपूर्ण नियंत्रण अथवा वर्चस्व तेथे प्रस्थापित करता आले नाही. हा प्रकार जॉर्ज बुश यांच्या कारकिर्दीपासून सुरू झालेले नव्हे, तर विकतचे हे दुखणे अमेरिकेला नकोसे झाले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी आम्ही हे असे  उद्योग आता करणार नाही, असे सांगत माघारीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी फक्‍त आता बायडेन यांनी केली. अमेरिकेच्या घरवापसीला कोणाचाच विरोध नव्हता. खुद्द त्या देशातील जनमतही या निर्णयाच्या बाजूनेच होते. मात्र, त्यांनी ज्या प्रकारे ही माघारीची प्रक्रिया सुरू केली त्यावर टीका झाली. आपले सैन्य, नागरिक तेथे असताना अचानक असे बाहेर पडणे बऱ्याच जणांना विशेषत: त्यांच्या राजकीय विरोधकांना रूचले नाही. धोक्‍याची कुणकुण ब्रिटनला लागली होती. तशीच ती अमेरिका आणि ऑस्ट्रेलियालाही लागली. त्यामुळे तातडीने अफगाण सोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात त्यांच्यावर नेम धरून बसलेल्या इसिसने डाव साधला.  अमेरिकेने आतापर्यंत जेवढी युद्धे लढली ती सगळी परकीय भूमीवर. असा प्रकार काही आज काळ घडला असे नाही तर पूर्वीही असेच घडत होते आणि यापुढेही असेही होत राहील . त्यातूनच शांतात निर्माण होईल असे दिसत नाही . त्यामुळे युद्धात होणारा विध्वंस किती विनाशकारी असतो हे माहीत असूनही त्यांना त्याची दाहकता क्‍वचितच जाणवली. आताही अफगाणिस्तानात हा हल्ला झाला. तशात शेजारील पाक आणि चीन यांचीही फूस तालिबान्यांना मिळत असल्याचे दिसू लागले आहे . त्यातून हा लढा आणखी कठीण होईल की काय असे वाटू लागले आहे ,. करणं  गेल्या वीस वर्षांपासून अमेरिकेने तेथे बस्तान बसवले होते. त्यामुळे एकप्रकारे त्यांना त्यांच्याच अंगणात, तेही घर सोडून जात असताना लक्ष्य केले गेले आहे. याचे पडसाद आगामी काळात बराच काळ उमटत राहणारआहे . एकट्या अमेरिकेलाच नाही, तर त्यांचे अध्यक्ष बायडेन यांना ही घटना कायम छळणार आहे. किंबहुना बायडेन यांचा कसोटीचा काळ आता सुरू झाला आहे. जागतिक मंचावर, अन्य देशांच्या आघाडीवर तसेच अगदी घरातही त्यांना आता संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. बायडेन यांच्या अगोदर ज्यांच्याकडे सूत्रे होती त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी बऱ्याच कोलांटउड्या मारल्या. त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे आणि बेछूट शैलीमुळे अमेरिकेची बरीच अप्रतिष्ठा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.