आघाडीचे प्रयोग

0 5

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे महाराष्ट्रही वाहू लागले असल्याने अनेकांचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे . कारण देशातील सर्वात मोठे राज्य असा लौकिक असलेल्या उत्तर प्रदेशात शिवसेना निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे . त्यातून शिवसेना उत्तर प्रदेशात कसा आणि किती प्रभाव पाडेल हे दिसेलच . पण यानिमित्ताने भाजपला शह देण्याचा नव्याने प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे . त्यासाठी शिवसेना इतर पक्षांची मदत घेईल असेही सांगितले जात आहे . खरे तर उत्तर प्रदेश काय किंवा इतर राज्यात काय शिवसेनेने निवडणुका लढविल्या आहेत . त्यात यश जरी आले नसले तरीही आपले अस्तित्व यानिमित्ताने दाखविले जाते . तसेच आपल्याला किती मते मिळतात यावरही अंदाज बांधला जातो आणि आपली ताकद आणखी वाढवण्यासाठी काय करायला हवे हेही अशा निवडणुकीतून दिसून येत असते . त्यामुळे राजकीय पक्ष अशा निवडणुका लढवीत असतात . त्यात विशेष असे काही नसते . अगदी आपल्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होईल याची जाणीव असली तरीही निवडणुका लढवल्या जातात . पण यातून सत्ताधारी पक्षाला आव्हान दिले जाते आणि राजकीय वचपा काढण्याचा प्रयत्न केला जात असतो . असा प्रकार उत्तर प्रदेशात केला जाईल असे दिसते . कारण उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची म्हणजे पर्यायाने भाजपची सत्ता आहे . ही सत्ता कायम राहील की नाही याबाबत मतभेद आहेत . तसेच मायावती यांच्या नेतृत्वाखाली बसपा आणि अखिलेश सिंह यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी लक्ष हेही ताकदीने मैदानात उतरणार आहेत . त्याची तयारी जोरात सुरु झाली आहे . त्या जोडीला काँग्रेस पक्ष हाही आपली ताकद अजमावणार आहे . तेथे तर गांधी कुटुंब जोर लावणार असल्याचे उघड झाले आहे . अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील अनेक मतदार संघात चौरंगी , पंचरंगी म्हणजे बहुरंगी निवडणुका होतील . त्यात मतविभाजन अटळ असल्याने त्याचा कुणाला कसा फायदा होईल याचेही गणित मांडले जात आहे . त्यामुळे स्वतंत्र निवडणुका न लढवता आघाडी केली जावी आणि मग निवडणुकीला सामोरे जावे असे मत व्यक्त केले जात आहे . त्यासाठी राजकीय पक्ष बोलणी करत आहेत . पण त्याला यश येत असल्याचे दिसत नाही . कारण प्रत्येकाला जास्त जागा हव्या आहेत . अशा जागा जास्त देणे शक्य होत नसल्याने अडचणी येत आहेत . त्यातून स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जातील असे दिसते . तसे झाले तर सत्ताधारी पक्षाला लाभ होईल . त्यामुळे आणखी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत . तशात शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केली आहे . त्यात किती जागा लढविणार असेही जाहीर केले . पण त्यांनतर त्यात बदल करून नंतर जागा ठरवल्या जातील असे जाहीर केले आहे . पण यातून उत्तर प्रदेशातील निवडणुकीकडे सवक पक्ष गांभीर्याने पाहत आहेत हे लक्षात येत आहे . त्यातूनच जर विरोधकांनी एकजूट केली तर या मोठ्या राज्यातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही हेही खरे .

Leave A Reply

Your email address will not be published.