बुद्ध संदेश

0 3

मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मारणार नाही अशी गर्जना महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्यानंतर देशातच नाही उडाली होती . त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर कोणता धर्म स्वीकारतात याची जगाला उत्सुकता लागली होती . मात्र धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर ठरणार नाही याची काळजी घेतानाच ज्या धर्मात विषमतेला थारा असणार नाही आणि सर्व मानवांचे कल्याण पाहिल असा धर्म डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना हवा होता . त्यासाठी बाबासाहेबांनी प्रचंड चिंतन केले आणि भारतीय मातीतील बौद्ध धम्माचा लाखो अनुयायांसह स्वीकार केला . त्यातूनच भारतातून लुप्त झालेल्या धम्माचे चक्र गतिमान झाले आणि माणसांना न्याय देणारा धम्म भारतात नव्याने दाखल झाला . कारण भारतासारख्या देशात विविध धर्म जरी धर्म जातीग्रस्त झाले असल्याने जातीचे चटके कमी अधिक प्रमाणात बसत असतात . त्यामुळे ज्या धर्मात माणसांना माणूस म्हणून वागविले जाते , जेथे कोणतेही शोषण केले जात नाही असा धर्म डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माच्या रूपाने मिळाला . त्यातूनच धर्मांतर केल्यानंतर भारतातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात प्रकाश आला आणि त्यांचे जीवन बदलून गेले . कारण तथागत गौतम बुद्धांनी आपल्या धम्माच्या माध्यमातून समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेत . ही विषमता वेगवेगळ्या प्रकारची होती . त्यातूनच हिंसाचाराला उत्तेजन दिले जात होते . पशु हत्या केली जात होती . तत्कालीन समाजात दुराचार मोठ्या वाढला होता . हा दुराचारकमी नाही तर नष्ट व्हावा आणि ,माणसांच्या आयुष्यात परिवर्तन व्हावे या खरा उद्देश होता . मात्र इथल्या वैदिक धर्म व्यवस्थेने बौद्ध धम्माल आणि त्यांच्या तत्वज्ञानाला विरोध केला . असा विऱोह्स केला तरीही जे सत्य असते ते कधीही नष्ट होत नसते . त्यातूनच बुद्ध धम्म जगातील अनेक देशात झपाट्याने पसरला आणि जगातील कोट्यवधी लोकांनी धम्माचा स्वीकार केला . आजही असंख्य लोक धम्माचा स्वीकार करून धर्मांतर करीत आहेत . कारण डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही धर्मावर सूड उगवण्यासाठी म्हणून धर्मांतर केले नव्हते . तर माणसांना माणुसकीचे अधिकार मिळायला हवेत या भूमिकेतून धर्मांतर केले होते . हीच भूमिका तथागत गौतम बुद्धांची असल्याने त्यांनी धम्माची स्थापना केली होती . कारण त्याकाळीही माणसांना समतेची वागणूक मिळत नव्हती . समाजात अनाचार आणि दुराचार माजला होता . हिंसेने टोक गाठले होते आणि हे सर्व धर्माच्या नावावर केले जात होते . त्यातूनच जगात शांतात नांदावी , अहिंसा वाढावी यासाठी उपदेश केले आणि त्याचा स्वीकार लोकांनी ,केला . कारण या समस्या केवळ भारतालाच भेडसावीत होत्या असे नाही तर जगातील सर्व देशांना त्या समस्यांनी ग्रासले होते . आजही याचा समस्या कमी अधिक प्रमाणात कायम आहेत . कारण बौद्ध धम्मातील चिरंतन अशी मूल्ये असल्याने तीच माणसांच्या उपयोगाची आहेत याची जाणीव होऊ लागली आहे . हाच संदेश लोकांनी अंगीकारावी म्हणजे समस्यांपासून मुक्ती मिळण्यास मदत होईल .

Leave A Reply

Your email address will not be published.