भेसळीला चाप

0 7

सणासुदीचे दिवस आले की बाजारात काही वस्तूंची मागणी अचानक वाढते . अशा काळात ज्याची मागणी जास्त असते अशा वस्तूत बनवटगिरी केली जाते . म्हणजे भेसळ होण्याचे प्रमाण याच काळात वाढत असते . असा प्रकार अनेक बाबतीत होत असला तरीही सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी जास्त असते . अशावेळी त्यात भेसळ केली जाते आणि असा माल खपवला जातो . त्यामुळे अन्न व औषध प्रशासन अशा काळात सर्तक राहते आणि कारवाई करण्याचा धडाका सुरु करते . आताही असा प्रकार केला जात आहे .  कारण अशी भेसळ ही जनतेच्या जीवावर उठणारी असते . त्यातूनच याच काळात विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत असते . म्हणून असे प्रकार टाळण्यासाठी खबरदारी घेतली जाते . त्यासाठी धाडी टाकल्या जातात .  लोकांमध्ये याबाबत जोपर्यन्त जागृती येत नाही तोपर्यंत अशा प्रकारांना आळा बसणार नाही हे सत्य आहे . त्यातून भेसळ कशी ओळखावी यासाठी प्रयत्न केले जातात . त्यासाठी अगदी सोप्या अशा पद्धती असतात . पण त्याची या,अंमलबजावणी लोककडूनचं केली जात नसते . कारण दैनंदिन लागणाऱ्या वस्तूत देखील भेसळ केली जाते . त्यातील दुधाची भेसळ तर सर्वां च्या परिचयाची असते . याबाबत आवाज उठवण्यात आल्यानंतर यासाठी असलेला कायदा हा आणखी कडक करण्यात आला . कारण पूर्वी असे कायदे कठोर  त्यासाठी शिक्षा मामुली अशा व्हायच्या . त्यामुळे असे प्रकार बंद होत नव्हते . पण जेव्हापासून यासाठी असलेला कायदा कडक करण्यात आला तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर हे प्रकार बंद झाले . पण तरीही जेव्हा सण येतात तेव्हा मात्र असे प्रकार घडू लागतात . त्यासाठी धाडी टाकण्याचे काम केले जाते . कारण या काळात मोठाईंची मागणी प्रचंड प्रमाणावर असल्याने यांचा पुरवठा  जाते . त्यासाठी मग भेसळ करण्याचा  मार्ग स्वीकारला जातो . विशेष म्हणजे मुंबई , ठाणे आणि उपनगरात लोकसंख्या जास्त असल्याने मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणावर असते . त्यासाठी लागणारे पदार्थ हे परराज्यातून येत असतात . त्यात दुधासह मावा आदी पदार्थांचा देखील समावेश असतो . त्यात भेसळ करून ती विकला जातो . त्यात काही जण गुंतलेले असतात .
ज्याला साखळी म्हटली जाते तशी साखळीच असते . त्यावर   देखरेख ठेवणे अवघड जात असते .  कारण शासकीय पातळीवर ज्या काही मर्यादा असतात त्यात मनुष्यबळ कमी असणे ही बाब असते . त्यातून कोरोना काळ असल्याने आणखी मर्यादा आल्या आहेत . त्यामुळे लोकांचा सहभाग जर वाढला तर अशा प्रकारांना सहज आळा घालता येऊ शकतो . म्हणजे याबाबत तक्रारी करणे हा जरी मार्ग असला तरीही भेसळ कशी ओळखावी हे जरी लोकांनी समजून घेतले    तरी देखील प्रमाणावर फरक पडू शकतो हे लक्षात घ्यायला हवे . त्यासाठी जागरूक राहणे हाच प्रभावी असा उपाय आहे . ते झाले तर भेसळ करण्याची कोणाची हिंमत होणार नाही .

Leave A Reply

Your email address will not be published.