राडा व्हायला नको

0 7

भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता दिसत  नाही .  कारण वादाचे नवनवीन मुद्दे मिळत असून वाद वेगळ्या स्थरावर पोहचत असल्याचे आढळून येत आहे . आताही बेळगाव महापालिका निवडणुकीचा मुद्दा मिळाला आहे . या निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे . तर शिवसेनेने ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती त्याचा पराभव झाला आहे . हा पराभव महाराष्ट्राच्या जनतेच्या जिव्हारी लागला आहे . तशात भाजपच्या काही नेत्यांनी पेढे वाटले आणि शिवसेनाला डिचवायची संधी साधली . त्याही पुढे जात भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी तर बेळगाव  तो झाकी है , मुंबई बाकी है अशा शब्दात वर्णन केले . त्याला खा . संजय राऊत यांनी जोरदार उत्तर देत सांगितले की ,तुमचा पक्ष जिंकला असेल, पण मराठी माणसाच्या एकजुटीचा तिथे पराभव झालाय. जे पेढे वाटतायत, त्यांना मराठी जनता माफ करणार नाही. शेकडो लोकांनी बलिदान दिलंय. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ६९ मराठी सैनिकांनी हौतात्म्य दिलंय. बाळासाहेब त्यासाठी तुरुंगात देखील गेले आहेत. पण तुम्ही पेढे वाटताय मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत तुम्हाला? राजकारण बाजूला ठेवा पण एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला पेढे वाटताना, जल्लोष करताना लाज वाटली पाहिजे”, असं देखील राऊत म्हणाले . तर त्याही पुढे जात महाराष्ट्र एकीकरण समिती तिथल्या मराठी माणसाची प्रातिनिधिक समिती आहे. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे देखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच पाठिशी उभे राहिले होते”, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितले .यावरून वाद आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यातून  राडा जर झाला तर त्याची जबाबदारी कुणाची असाही प्रश्न पडू लागला आहे . या व्यतिरिक्त प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानी रा . स्व .  संघ यांची तुलना केली असल्याने वादाची ठिणगी पडली आहे . अशा प्रकारचे वाद की=जेव्हा होतात तेव्हा ए केवळ राजकीय वाद राहत नाहीत तर त्याला धार्मिक वळण मिळत असते . असा प्रकार सुरु झाला की मग हा वाद कोणते वळण घेईल हे सांगता येत नसते . तशात राज्यात कोरोनाची तिसरी लाट  येण्याची शक्यता निर्माण झाली आहे . त्याला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे . त्यातून गर्दी केली जाऊ नये असे सतत आवाहन केले जात आहे . त्यात स्वात मुक्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेते बैठका घेतल्या असून राजकीय नेत्यांनी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे . त्यातूनच मंदिरे उघडण्याची घाई केली जाणार नाही असेही सांगितले गेले आहे . मात्र यावरूनही वाद निर्माण केले जात असून सरकारवर टीका केली जात आहे . म्हणजे टीका करण्याचे अनेक विषय असल्याने वाद वाढत चालला आहे . त्यातून राडा होईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे . ते राडे जर सुरु झाले की  मग मूळ विषय बाजूला पडेल हे निश्चित .

Leave A Reply

Your email address will not be published.