दिलासा तर मिळाला

0 3
कोरोनाची  तिसरी लाट येवो वा नये येवो पण जागतिक आरोग्य संघटनेने समस्त भारतीयांना दिलासा देणारी बातमी जाहीर केली आहे . त्यात जाहीर  करण्यात आले आहे की ,करोनासोबत जगणं भारतीयांच्या अंगवळणी पडले आहे .तरीही भारतीयांनी गाफील राहून चालणार नाही असेही बजावण्यात आले आहे .  कारण  याबाबत  जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी काही महत्वाची माहिती दिली आहे . त्यात त्यांनी लसीकरण करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे  . स्वामीनाथन यांनी आशा व्यक्त केली की २०२२ च्या अखेरीस पर्यंत भारत ७० टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य करण्याच्या स्थितीत आहे. हे लसीकरण झाल्यानंतर देशात परिस्थिती सामान्य होईल, असेही त्या म्हणाल्यात. मुलांमध्ये करोनाच्या प्रसारावर स्वामीनाथन म्हणाल्या की, “पालकांनी घाबरण्याची गरज नाही.
आम्ही सेरो सर्वेक्षण पाहतोय़ आणि इतर देशांकडून जे शिकलो त्यातून दिसते की मुलांना संसर्ग होण्याची शक्यता असली तरी बहुतेक मुलांना सुदैवाने अतिशय सौम्य प्रकारचा संसर्ग होतो.” कारण आपल्याकडे तिसरी लाट येईल आणि त्यात मुलांना धोका राहील अशी शक्यता वर्तविली जात आहे . त्यामुळेच शाळा सुरु कराव्यात की नाहीत यावरून वाद निर्माण होत होता . कारण अशावेळी मुलांची जबाबदारी कुणी घ्यावी हा खरा प्रश्न असल्याने सरकारही  घेत नव्हते . तशात लसीकरण करण्याबाबत मर्यादा असल्याने कोरोनाची भीती कायम होती . पण तरीही काही ठिकाणी गर्दी केली जातच होती . त्यात पुन्हा राजकीय नेत्याच्या सभा , रॅल्या जोरात सुरु होत्या . त्याजोडीला सण – उत्सव असल्याने लोकांचा उत्साह वाढत जातो . म्हणजे लस घेतली तर आपल्याला काहीही होणार नाही असा समज काहीं झालेला असल्याने कोरोनाचा प्रसार वाढण्यास मदत होत असते . म्हणजे या सर्व प्रकारांबाबत संभ्रम कायम होता . तसेहच लस निर्माण करणाऱ्या कंपन्याही वेळोवेळी वेगवेगळी माहिती जाहीर करत असतात . त्यातून कोणती लस प्रभावी असाही प्रश्न  पडत असतो . यावर उपचारासाठी रेमडेसिविर, एचसीक्यू किंवा इव्हरमेक्टिन सारख्या औषधांचा वापर करण्यावर जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हणाल्या की, “आजपर्यंत असे कोणतेही पुरावे नाहीत की एचसीक्यू किंवा इव्हरमेक्टिनच्या वापरामुळे संक्रमित लोकांचा मृत्यू किंवा रुग्णसंख्या कमी करण्यात किंवा प्रत्यक्षात लोकांना संसर्ग होण्यापासून रोखण्यात यश आलं आहे.  म्हणून उपचार किंवा प्रतिबंधासाठी यापैकी कोणत्याही औषधांचा वापर करण्याची शिफारस करता येतील अशी कोणतीही कारणे सध्या उपलब्ध नाहीत.तसेच  स्वामीनाथन म्हणाल्या की, “आपण बहुधा स्थानिक पातळीच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत, जिथे कमी किंवा मध्यम पातळीचा प्रसार आहे. आम्हाला आता काही महिन्यांपूर्वी दिसलेली रुग्णसंख्येतील प्रचंड वाढ आणि तशी एकंरदरित परिस्थिती सध्या दिसत नाहीय. भारताचे आकारमान आणि लोकसंख्येची विविधता आणि देशाच्या विविध भागांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची स्थिती पाहता, ही परिस्थिती खूपच व्यवहार्य आहे आणि अशीच परिस्थिती कायम राहू शकते. तसेच देशाच्या विविध भागांमध्ये रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळू शकतो.” यावरून कोरोनाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे असे म्हणायला हवे .
Leave A Reply

Your email address will not be published.