ड्रॅगनचा धोका

0 4

अफगाणिस्थानात झालेल्या सत्ता बदलाकडे सर्व जगाचे लक्ष लागले असतानाच चीन आणि पाकिस्थान यांनी तेथील तालिबानी राजवटीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे . विशेष म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिनी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना चीनकडून भारताला कसा धोका आहे असे वक्तव्य रा, स्व, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते . भागवत यांच्या वक्तव्याचा संदर्भ हा वेगळा असला तरीही चीनपासून भारताने कायम सावध राहायला हवे असे भागवत याची सुचवले होते . त्यांनी सांगितले होते की , स्वदेशी याचा अर्थ भारताच्या अटींवर व्यापार करणे असा आहे. आपण इंटरनेट व अन्य तंत्राचा वापर भरपूर करतो, मात्र त्याचे तंत्रज्ञान आपण बाहेरून आणतो. आपण समाज म्हणून चीन तसेच तेथील वस्तूंवर बहिष्काराची भाषा करतो. मात्र तुमच्या मोबाइलमध्ये जे काही येते ते कोठून? असा सवाल करत, सरसंघचालकांनी चीनवर अवलंबित्व वाढविणे हिताचे नाही, असा इशारा दिला. हा इशारा दिल्यानंतर अफगाणिस्थानात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलटंपालथी घडल्या आणि तेथे तालिबानी सत्तेत आले . त्यामुळे जगाचे लक्ष अफगाणिस्थानकडे लागले असून भारतानेही याबाबत मौन बाळगले आहे . कारण अमेरिकेशी पंगा घेत तालिबान्यांनी सत्ता ताब्यात घेतली असल्याने अमेरिका शांत बसणार नाही असे सांगितले जात आहे . अशा परिस्थिती चीन आणि पाक या दोघांनी तालिबान्यांना सरळ पाठिंबा देऊन टाकला आहे . त्यामुळे भारताला असलेला धोका हा आणखी वाढेल असे दिसते . कारण तालिबानी राजवटीला भारत पाठिंबा देणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे . पण चीन आणि पाक यांनी तसे न करता घाई करून त्यांना पाठींबा दिला आहे . म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणतात तसा प्रकार घडला आहे . यामुळे तालिबानी आणखी शिरजोर ठरू शकतील . असे झाले तर भारतात दहशतवादी कारवाया आणखी वाढू शकतील . कारण चीन भारताशी कायम संघर्ष करीत आला आहे . भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न चीनचे असतात . हे प्रयत्न भारत हाणून पाडत असल्याने चिनी ड्रॅगन खवळला असल्याचे आढळून आले आहे . त्यामुळे तालिबान्यांना मदत करून भारतात घातपाती कारवाया केल्या जातील . अर्थात असे करणे वाटते तितके सोपे नाही . पण तरीही भारताला खबरदारी घ्यावी लागणार असल्याने पुढे काय काय घडामोडी घडतात याकडे मोदी सरकारचे लक्ष लागलेले आहे . कारण अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्थान बेचिराख झाला होता तेव्हा भारताने मदत केली आणि अफगाणला उभे राहण्यास साहाय्य केले होते . त्याचा बदल तालिबानी काढू शकतात अथवा धार्मिक तणाव निर्माण करून भारतात काही तरी कुरापती काढल्या जातील अशीही शक्यता गृहीत धरली जात आहे . अशावेळी संघाने जो सूचक इशारा दिला होता त्यानुसार केंद्र सरकार कशी भूमिका घेते हे पुढील काळात दिसेल . पण चीन आणि पाक या दोन्ही देशांबरोबर आता अफगाणमधील तालिबानी यांच्याशीही लढण्याची वेळ भारतावर येण्याची शक्यता वाटू लागली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.