महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न

0 6

महिला सुरक्षेचा प्रश्न वारंवार चर्चेत येत असतो . कारण भारतासारख्या देशात असलेल्या समाज व्यवस्थेमुळे जे अनेक प्रश्न निर्माण होतात त्यात महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो . कारण भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते . याचे कारण म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती . त्यामुळे महिलांना सामंततेची वागणूक दिली जात नसते . त्यासाठी कायदे करण्यात आले असून या कायद्यांमुळे महिलांवर अन्याय , अत्याचार होणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात आली आहे . परंतु तरीही अशा घटना घडतात की त्या कायद्यांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न साहजिक विचारला जात असतो . कारण कायदे कठोर केलेत तरी समस्या संपत नाहीत असा अनुभव येत असतो . महिलांवरील अन्यायाबाबत हाच प्रकार घडत असतो . त्यामुळे जेव्हा जेव्हा हा विषय चर्चेत येतो तेव्हा अशा प्रकारे मत व्यक्त केले जाते की कायदे आणखी कठोर केले जावेत . पण या कायद्यांचा आधार घेत असा काही घटना घडतात की त्याचा दुरुपयोग तर केला जात नाही ना अशीही शंका येऊ लागते . हा प्रकार जळगावमध्ये उघड झालेल्या कथित महिलांच्या शोषणाचा आहे . महिला वसतिगृहात मुलींसोबत गैरवर्तन झाल्याचे नुकतेच समोर आले होते . त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील उमटले होते आणि राज्य सरकारवर टीका होऊ लागली होती . कारण याबाबतचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने सरकारची कोंडी झाली होती . त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यात तथ्ये नसल्याचे समोर आले आहे . याबाबत राज्य सरकारने पोलिसांना क्लीन चिट दिली आहे . कारण पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात होते . मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत असा प्रकार घडला नसल्याचा निर्वाळा दिला गेला . त्यामुळे या निमित्ताने निर्माण झालेलावाद शांत होईल अशी आशा करायला हवी . खरे तर यापूर्वीही जळगावचे नाव या लैंगिक अत्याचाराच्या प्रकारात बदनाम झाले होते . काही वर्षांपूर्वी संपूर्ण देशभरात जळगावचे हे प्रकरण गाजले होते . त्यात अनेक प्रतिष्ठित लोकांची नावेही घेतली गेली होती . तेव्हाही अशा प्रकारे व्हिडीओ बनविण्यात आले होते आणि त्याचे प्रसारण केले गेले होते . अनेक महिने हे प्रकरण गाजत राहिले आणि शेवटी त्याही काहींना शिक्षा झाली . त्यानंतर मात्र जळगावची प्रतिमा पूर्णपणे बदलून गेली होती . पण आत दीर्घ काळानंतर असा प्रकार घडल्याचे समोर आल्याने अनेकांच्या मनातील त्या आठवणी ताज्या झाल्या असतील . अर्थात त्यानंतर राज्याच्या अन्य भागात अशा घटना घडल्या होत्या . पण तरीही त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती . मात्र आता पुन्हा जळगावचे नाव समोर आल्याने असा प्रकार होण्यामागील नेमकी काय कारणे असावीत हेही समोर यायला हवे . कारण अनेकदा से होते की स्वार्थ साधण्यासाठी काही जण जाणीवपूर्वक असे प्रकार करीत असतात . त्यामुळे जर खरोखर असे प्रकार जेथेघडतात तेथे मात्र ते प्रकार दाबण्याचे काम केले जाते . म्हणून अशा प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊनच त्याची वाच्यता करायला हवी .

Leave A Reply

Your email address will not be published.