फेरीवाल्यांचा प्रश्न

0 5
ठाणे पालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाल्यानंतर फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे . या प्रकारानंतर ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पिंपळे यांची भेट घेऊन या विषयाकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. तसेच फेरीवाले कशा पद्धतीने दादागीरी करतात आणि लोकांना वेठीस धरतात असेही सांगितले जाऊ लागले . मात्र या विषयाकडे कोणत्याही एकाच बाजूने पाहता येत नसते . कारण सर्व क फेरीवाले दादागिरी , गुंडगिरी करतात असे नाही . तर यापैकी  असंख्य जण पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करतात . ज्या प्रमाणे रिक्षा चालक असतात असेच फेरीवालेही असतात . हा सर्व कष्टकरी समूह म्हणून ओळखला जातो . मात्र जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा सर्वच जणांना एकाच मापात मोजण्याचा प्रकार केला जातो . असा प्रकार होऊ नये यासाठी फेरीवाल्यांचे परवाने दिले जावेत अशी मागणी पुढे आली होती . त्यानंतर रीतसर परवाने दिले गेले . म्हणजे ज्यांना प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा आहे अशाना व्यवसाय करता यावा हा उद्देश त्यामागे होता . पण काहींनी त्याचाही गैरफायदा घेणे चालविले आणि वाद वाढायला मदत झाली . त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी सर्वानीच घ्यायला हवी . असे झाले तरच वाद वाढणार नाहीत आणि त्याची झळ प्रामाणिक माणसांना बसणार नाही . त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय करू नये . त्यासाठी कायदा जरी असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल अशी व्यवस्था करायला हवी . नाही तर सरसकट कारवाई केली तर काहींवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही . कारण हल्ली कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार गेले आहेत . त्यामुळे मिळेल ते काम करून उदर्निवाह करण्याची धडपड सुरु आहे . त्यात मराठी माणसांचा देखील समावेश आहे हेही विसरून चालणार नाही . त्यामुळे यात फक्त काही लोकच दादागिरी करतात असे नाही तर वेळ आली की कोणीही असा प्रकार करू शकतो . त्यामुळे हा विषय  हाताळताना सर्व बाजूनी विचार करण्याची गरज असते . त्यासाठी नव्याने सर्वे करण्याची वेळ आली तर तसे करण्यात यावे . कारण हातात अनेकांना काही ना काही रोजगार हवा आहे . त्यासाठी परवाना मिळाला तर तो हवाच असतो . त्यामुळे जे जे अनधिकृतपणे असा व्यवसाय करत असतील आणि दादागिरी करत असतील अशाना मनाई करावी आणि गुन्हे दाखल करण्याची वेळ आली तर मागे पुढे पाहू नये . असे केले तर प्रामाणिक व्यवसाय करणार्यांना दिलासा मिळेल . त्यामुळे हा विषय केवळ राजकीय विषय नाही तर सामाजिक देखील विषय असल्याने त्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज असते . अशात जे अनधिकृतपणे व्यवसाय करीत असतील अशांवर कारवाई तर केली जावेच पण त्यांना संरक्षण देणारे कोण असतात त्यांनाही हुडकून काढायला हवे . कारण यात काही जण असे संरक्षण देण्याचे काम करीत असल्याचेही समोर येत असते . त्यामुळे हा विषय वाटतो तितका सोपा नसावा असेही दिसत असल्याने यावर सर्व बाजूंचा विचार  वाटते .
Leave A Reply

Your email address will not be published.