राजकीय चकमक

0 4

जनआशीर्वाद यात्रेला वेगळे वळण लागेल अशी शक्यता जर कुणी व्यक्त केली असती तर ती चुकीची ठरली असती . पण असा प्रकार झाला आणि ही जन आशीर्वाद यात्रा लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहणारी ठरली . कारण या यात्रेच्या निमित्ताने कोकणच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली आणि राज्यात राजकीय चकमकी सुरु झाल्यात . कारण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला होता आणि त्यात त्यांनी काही अपशब्द वापरले . त्याऊनन राणे यांच्याविरुद्ध नशिकसह काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले तेव्हाच काही तरी विपरीत घडू शकेल याची जाणीव होऊ लागली होती . पण राणेंना अटक होईल असे मात्र वाटत नव्हते . पण राजकारणात केव्हा काय घडेल याचा भरवसा देता येत नसतो . त्यात पुन्हा राजकीय हाडवैर असले की मग विचारता सोय नसते . त्यातून नेते कितीही मोठा असला तरी जेलमध्ये टाकण्याची भाषा केली जाते . अशी भाषा राजकीय नेते सर्रास वापरत असतात . म्हणजे निवडणुकीच्या प्रचार तर अशी भाषा वापरली जात असते . पण त्यानंतर कुणालाही जेलमध्ये टाकले जात नसते . परंतु तरीही अशी वेळ येते की नेत्यांना जेलमध्ये जावे लागते . तेव्हा त्याचे पडसाद राज्यात उमटतात आणि वाद वाढत जातो . राणे यांच्या अटकेनंतर हाच प्रकार होत आहे . कारण राणे यांना झालेली अटक राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली आहे असा आरोप त्यांच्या समर्थकांचा आहे . त्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांची कोणतीही गैर केली जाणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे . त्यात ही राणे आणि शिवसेना यांच्यातील वैर तर सर्वपरिचित आहे . त्यात पुन्हा भाजपची साथ असल्याने या वादाचा समारोप लवकर होईल असे दिसत नाही . कारण राणे यांना अटक झाल्यानंतर अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण झाला . त्यात शिवसेना आणि राणे समर्थक असा सामना रंगला होता . असा प्रकार याही पूर्वी अनेकदा घडला आहे . मात्र राणे यांचा समावेश केंद्रीय मंत्री मंडळात झाल्यानंतर हा वाद जास्त पेटेल असे जे वाटत होते ते खरे ठरू लागले आहे . त्यातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्याची संधी भाजपचे नेते साधत होते . कोरोना महामारी , त्यानंतर आलेली अतिवृष्टी , महापूर अशा काळात राज्य सरकारवर टीका करून सरकारला धारेवर धरले जात होते . त्यात राणे हे आक्रमक नेते म्हणू  ओळखले जात असल्याने त्यांचा संघर्ष शिवसेनेशी सतत होत आला आहे . पण मंत्री झाल्यानंतर अशी कारवाई राज्य सरकार करणार नाही असे वाटत होते ते चुकीचे ठरले आणि राणेंना जेलमध्ये टाकले गेले . त्यामुळे यापुढे काय काय घडामोडी घडतात हे पाहावे लागेल . कारण आता हा वाद देश पातळीवर पोहचला असून केंद्रीय नेते काय भूमकक घेतात हे महत्वाचे असणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.