रेल्वेला भुर्दंड

0 1

रेल्वेला उशीर झाल्याने प्रवाशाला भरपाई देण्याची वेळ रेल्वेवर आली आहे . त्यामुळे यापुढे रेल्वे काय खबरदारी घेते हे पाहणे महत्वपूर्ण असणार आहे . कारण रेल्वे वेळापत्रकानुसार चालेल हे सांगता येत नाही . त्यातही मुंबईची लोकल सेवा असो की लांब पल्ल्याच्या रेल्वे असो त्या उशिराने धावत असतात . हा उशीर किती असले हेही सांगता येत नाही . मुंबईत तर काही मिनिटांसाठी जरी लोकल उशिराने धावू लागली तरी किती गर्दी उसळते हे सर्वांना माहित असते . तरी हल्ली कोरोना असल्याने गर्दी फारशी होत नसते . कारण अद्याप सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दार उघडलेले नाही . त्यासाठी अनेक बंधने लावण्यात आली आहेत . पण बाहेर गावी जाणार्यांना मात्र असा त्रास सहन करावंच लागत असतो. अशावेळी लोकांचे किती हाल होतात हे सांगण्याची गरज नसते . कारण ज्या कामासाठी बाहेर जावे लागते ते काम रेल्वे वेळेवर नसल्याने होत नसते . त्यातूनच मोठ्या प्रमाणावर त्रास सहज करावा लागतो . हा त्रास शारीरिक , मानसिक आणि आर्थिक अशा प्रकारचा असतो . त्यामुळे असे प्रकार होणार नाही याची काळजी घडतली जावी अशी मागणी केली जाते . विशेष म्हणजे अनेक देशात विशेषतः पाश्चिमात्य देशात तर रेल्वे कधीही उशिराने धावत नसते . तसे झाले तर ती चूक मान्य केली जाते आणि ज्यांना त्रास झाला अशाना भरपाई दिली जाते . पण आपल्या देशात असा काही प्रकार घडत नसतो . घडलाच तर तो अपवाद ठरत असतो .असाच अपवाद घडला आणि रेल्वेला भरपाई देण्याचे आदेश दिले गेलेत . त्यासाठी संजय शुक्ला यांनी दाद मागितली होती . शुक्ला हे 11 जून 2016 रोजी अजमेर-जम्मू एक्स्प्रेसने आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. ही ट्रेन सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होती. मात्र ट्रेन 12 वाजता नियोजित ठिकाणी पोहोचली. त्यामुळे 12 वाजता जम्मू विमानतळावरून सुटणारं विमान निघून गेलं. त्यामुळे कुटुंबाला जम्मू ते श्रीनगर असा प्रवास टॅक्सीने करावा लागला. या प्रवासासाठी त्यांना १५ हजार रुपये मोजावे लागले. तसेच हॉटेलमध्ये राहण्यासाठी 10 हजार रुपयांचा वेगळा खर्च आला. या नाहक त्रासामुळे शुक्ला यांनी ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली होती. यानंतर, अलवर जिल्ह्याच्या ग्राहक मंचाने उत्तर पश्चिम रेल्वेला संजय शुक्ला यांना ३०,००० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. राज्य आणि राष्ट्रीय मंचानेही ग्राहक मंचाचा हा निर्णय कायम ठेवला. यातून रेल्वे काही धडा शिकेल अशी आशा करायला हवी . कारण असे अनुभव तर सर्वच लोकांना येत असतात . पण सर्व जण काही कोर्टात जात नसतात . कारण कोर्टाचा निकाल लगेच लागेल आणि भरपाई मिळेल असेही होत नसते . त्यामुळे रेल्वेने कितीही उशीर केला तरी लोक सहन करीत असतात . कारण नाईलाज असतो . पण आता अशा पद्धतीने दंड करण्यात आला असल्याने रेल्वेच्या कामकाजात सुधारणा होईल आणि वेळेवर रेल्वे धावतील असे म्हणायला हवे .

Leave A Reply

Your email address will not be published.