राजकीय रणनीती

0 3

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक शाखा असलेल्या  भारतीय किसान संघाने नागपुरात केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध आंदोलन केल्याने अनेकांचे लक्ष याकडे वेधले गेले आहे . कारण अशा प्रकारचे केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध आंदोलन जेव्हा संघ परिवाराकडून केले जाते तेव्हा त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात . मात्र अशा प्रकारे आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य संघ परिवारातील प्रत्येक संघटनेला असते असे सांगून वाद पेटणार नाही अशी व्यवस्था संघाकडून केली जाते . असा प्रकार याहीपुर्वी करण्यात आला होता . विशेषतः इन्फोसिस प्रकरणी ‘पांचजन्य’ने जी कडक भूमिका घेत टीका केली होती त्यावरून वाद निर्माण होऊ लागला होता . पण अशावेळी सावध भूमिका घेतली गेली आणि संघाने त्याचा इन्कार केला . असाच प्रकार याहीबाबतीत घडवह्याची शक्यता नाकारता येत नाही . अर्थात हा झाला पुढील विषय . पण संघप्रणीत  भारतीय किसान संघाने जी भूमिका घेत आंदोलन केले ते महत्वाचे आहे . कारण शेतमालाला हमी भाव हा महत्वाचा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला . तसेच केंद्र सरकारची  शेतकरी विरोधी धोरणाविरोधात  आपले आंदोलन असल्याचे जाहीर करण्यात आले आणि यापुढे देशातील गावागावात जाऊन आंदोलन करण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले . असे आंदोलन केव्हा केले जाईल हे लवकरच जाहीर होईल . पण यानिमित्ताने संघ परिवारातील संघटना मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले . कारण हा प्रश्न शेती आणि शेतकऱ्यांचा आहे . त्यासाठी देशातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत . विशेषतः मोदी सरकारने जे शेती विषयक तीन कायदे मंजूर केले तेव्हा पासून देशातील शेतकरी संतप्त झाला आहे . त्यानंतर नवी दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात आले . त्यात लाखो शेतकरी सहभागी झाले होते . पण कोरोना आणि लॉक डाऊन यामुळे हे आंदोलन मागे घेतले गेले . पण आता नव्याने हे आंदोलन उभे केले जात आहे . त्यासाठी उत्तर प्रदेशात महापंचायत घेतली गेली आणि भारत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला गेला आहे . त्यात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांचा देखील पाठिंबा मिळणार आहे . त्यामुळे पुढील काळात हा विषय आणखी तापणार असल्याचे दिसत आहे . अशा परिस्थितीत संघ परिवार गप्प बसणार नाही हेच यातून सूचित झाले आहे . अर्थात केंद्र सरकारविरुद्ध प्रतिनिधीतक आंदोलन करावे असा सल्ला संघाकडून दिला गेला होता . पण त्यात काहींनी जोरदार आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता . त्यावरून पुढे काय होते याचे उत्सुकता लागलेली होती . कारण संघ परिवारातील संघाचं जर केंद्र सरकारविरुद्ध भूमिका घेत असतील तर देशात वेगळा संदेश जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती . पण देशातील शेतकर्यां ची जर सहानुभूती जर मिळवायची असेल तर असे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही अशी ठाम भूमिका घेतली गेली आणि त्यांनतर नागपुरात प्रतिनिधीतक स्वरूपात का होईना पण आंदोलन केले गेले . त्यामुळे पुढे काय धोरण स्वीकारले जाते यावर रा . स्व . संघ आणि केंद्र सरकार यांच्यातील तणाव कसा राहील हे स्पष्ट होईल .

Leave A Reply

Your email address will not be published.