शोकमग्न महाराष्ट्र

0 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात असतानाच अनेकांना मृत्यू गाठत असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे २२ जणांना प्राण गमवावे लागण्याची हृदयद्रावक घटना घडली . त्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि देशातही शोक व्यक्त केला जाऊ लागला . कारण अशा प्रकारची घटना घडेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती . कारण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन म्हणजे प्राण वायूचा पुरवठा हा खऱ्या अर्थाने जीव वाचवणारा ठरत असतो . त्यामुळे महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा केले जावा अशी मागणी केली जात होती . याबबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीचा लष्कराचा वापर करून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा अशी मागणी केली होती . कारण अशा कामाबाबत भारतीय लष्कर अत्यंत वेगाने काम करण्यात प्रसिद्ध आहे .आपल्या कामात कोणतीही कसूर राहणार नाही याची काळजी घेतली जाते . ती मागणी मान्य झालेली दिसत नाही . मात्र ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जे अन्य पर्याय आहेत त्याचा विचार करून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे . त्यासाठी किती तज्ज्ञ कामाला आहेत हे सांगता येत नाही . मात्र हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे . कारण नाशिकमध्ये टँकरमधून ऑक्सिजन टाकीत भरला जात असताना गळती झाली आणि रुग्णांचा प्राणवायू खंडित झाला . त्यामुळे त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि २२ जणांना प्राणास मुकावे लागले . हा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे . कारण त्यानंतर काही रुग्णांना तातडीने स्थलांतर करण्यात आले . त्यामुळे त्यांचे प्राण वाचले असल्याचे सांगितले जात आहे . पण तरीही त्यांच्या समोरील धोका कायम असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे . त्यामुळेच या सर्व प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच , पाच लाखाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली . तसेच याबाबत कोणत्या शब्दात शोक व्यक्त करावा असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना प्रकट केल्या . अर्थात असे काही प्रसंग असतात की ते पाहून वा एकूण माणसे सुन्न होऊन जातात . नाशिकमधील प्रकारही असाच सुन्न करणारा आहे . कारण जो ऑक्सिजन म्हणजे प्राण वायू मिळावा यासाठी धडपड केली जात आहे त्याचा प्राणवायूचा योग्य पद्धतीने वापर न झाल्याने माणसांना मरण येऊ शकते हेही यातून दिसून आले आहे . म्हणजे लहानशी चूक वा उणीव ही देखील कशी मरणास कारणीभूत ठरू शकते याचीही प्रचिती आली आहे . त्यामुळे असे प्रकार कशा पद्धतीने टाळता येऊ शकतात यावर भर देण्याची गरज आहे . कारण आज अशा बाबींची गरज मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने त्याची हाताळणी करणारे मनुष्यबळ हेही कुशल हवे असते . ते जर नसले तर कोणत्तेही संकट केव्हाही कोसळू शकते याहव धडा यातून घ्यायला हवा . त्यातूनच अशा बाबतील डोळ्यात तेल घालून काम करायला हवे तरच लोकांचे प्राण वाचण्यास मदत होईल अन्यथा अशा पद्धतीने लोक हकनाक मृ लागतील .. म्हणून हा धोका कसा टाळता येईल याचा विचार करायला हवा .

Leave A Reply

Your email address will not be published.