खळबळ तर माजणार

0 3

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून खळबळ उडणे स्वाभाविक आहे . कारण भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला या पत्रात देण्यात असल्याने पडद्याआड काही तरी  मोठ्या घडामोडी घडत असतील असे वाटू लागले आहे . याचेही प्रमुख कारण म्हणजे सरनाईक यांच्यामागे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा लागला आहे . त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याने ते चर्चेत होते . कारण त्यांना मातोश्रीमध्ये लपवून ठेवण्यात आले असावे असा  भाजपच्या नेत्याने केला होता . तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात असलेला तणाव वाढत चालला आहे . त्यात भर पडली ती दादर येथेही शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्याची . यात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या . त्यात कण दोषी यावर चर्चा केली जात असतानाच प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला . असा सल्ला हा व्यक्तिगत पातळीवर दिला गेला असावा अशी शक्यता जरी वर्तविली जात असली तरीही त्याला दुसरी बाजू असू शकते हेही विसरता कामा नये . कारण अशा  राजकीय घडामोडी जेव्हा घडतात तेव्हा त्याची आधी चाचपणी केली जाते . त्यावर चर्चा घडवून आणली जाते . लोकांची  , कार्यकर्त्यांची , नेत्यांची काय काय मते आहेत हे जाणून घेतले जाते . त्यानंतर लोकांचा आग्रह असल्याने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला असे वरिष्ठ नेते सांगून युती वा आघाडी करण्याचा निर्णय घेत असतात . आतापर्यंत हाच मार्ग अनुसरण्यात आला आहे . त्यामुळे कदाचित सरनाईक यांच्या मनात असेल वा नसेल पण याविषयावरून राज्यातील वातावरण तापले आहे हे नक्की . कारण भाजपचे नेते जास्त आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी करीत आहेत . ते जितकी टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर करीत नाही त्यापेक्षा जास्त टीका शिवसेनेवर केली जात आहे .  असे असले तरीही भाजप आणि शिवसेना यांच्यात वैचारिक साम्य मोठ्या प्रमाणावर आहे . त्यात हिंदुत्वाचा मुद्दा प्रमुख आहे . मात्र त्यावरूनच शिवसेनेने भाजपची कोंडी करीत भाजपचे हिंदुत्व कसे बेगडी आहे हे शिवसेना सातत्याने दाखवून देत आहे . त्यामुळे जे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करायला हवे ते काम शिवसेना करू लागली आहे . अशा परिस्थितीत काँग्रेसने तर अलीकडच्या काळात स्वबळावर निवडणुका लढविण्याची भाषा  केली आहे . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही भूमिका मांडल्यापासून सत्तेतील पक्षात सर्व काही आलबेल नाही हा संदेश राज्यात गेला आहेच . त्यातूनच राज्यातील महाविकासआघाडी सरकार पाच वर्षांचा काळ पूर्ण करणार की नाही अशी शंका घेतली जात आहेच . अशा परिस्थितीत जेव्हा सरनाईक यांच्यासारखा नेता युती करण्याची भाषा करतो तेव्हा त्याची चर्चा होणार हे उघड असल्याचे अशी चर्चा होता आहे तसेच त्यामुळे खळबळ उडाली आहे . पण अंतिम निर्णय काय होतो हे महत्वाचे असेल हेही तितकेच खरे आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.