अनलॉक तर होणार

0 5

महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून कोरोनाचा धोका टळला आहे , असे समजण्याचे मुळीच कारण नाही . उलट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका ज्या पद्धतीने बसला आहे त्यातून खूप काही शिकायला मिळाले असे समजून लोकांनी आपल्या वतर्णुकीत बदल करायला हवी . कारण कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली असून काळ्या बुरशीचा धोकाही वाढला आहे . या आजारावर उपचार करणे हे खूपच खर्चिक असल्याने पुढील काळात खबरदारी घ्यावीच लागणार आहे . ही खबर्दाराई जर घेतली नाही नाही तर कसे जीवघेणे संकट येऊ शकते हे दिसले आहेच . त्यामुळेच राज्य सरकारने सावध पाऊले टाकायला सुरवात केली आहे . त्याचाच एक भाग म्हणून अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांत लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांत पाच किंवा त्यापेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असून त्याआधारावरच सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अहमदनगर, अमरावती, हिंगोली आणि नंदूरबार या सहा जिल्ह्यांत लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या १० जिल्ह्यांचा समावेश आहे तर चौथ्या टप्प्यात पुणे, रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजे राज्याच्या विविध भागातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला गेला आहे . मात्र मुंबईकरांना आणखी त्रास सहन करावा लागेल . कारण मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकलसेवा सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप बंद ठेवली जाणार आहे . अर्थात लवकरच त्याचाही निर्णय होऊ शकले आणि लोकलचे दरवाजे सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले होतील असे मानायला हवे . मात्र या काळात जर लोकांनी बेफिकिरी दाखवली तर कोरोनाचा उद्रेग होऊ शकतो लक्षात घ्यायला हवे . तसेच लसीकरण करायण्यावर जोर दिला जाणार असल्याने लोकांनी त्यासाठी तयार राहायला हवे . कारण जगातील अनेक देशांनी लसीकरण पूर्ण केले आणि आपल्या देशातील लॉक डाऊन उठविले आहे . त्यामुळे भारतात देखील हाच प्रकार केला जात आहे . कारण सुरवातीला लस मिळत नसल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली होती आता लस मिळत असल्याने हा प्रश्न निकाली निघाल्यासारखा आहे . कारण आता लस खाजगी क्षेत्राला देखील दिली जात असल्याने कोणतीही अडचण येणार नाही असे म्हणू या . पण त्यामुळे पूर्वीसारखे दिवस येतील असे जर कुणी संमजत असेल तर ते चुकीचे ठरू शकते . कारण कोरोनाचा आणि इतर आजारांचा धोका कायम राहील हे लक्षात घेऊनच व्यवहार करायला हवेत . म्हणजे सरकार वेळोवेळी जे आदेश देईल त्याची अंमलबजावणी करणे सक्तीचे राहणार आहे . तसे केले तरच कोरोनाची साखळी खंडित व्हायला मदत होईल आणि लोकांना पूर्वीसारखे वागायला मोकळीक मिळेल .

Leave A Reply

Your email address will not be published.