विश्वास वाढला

0 1

भारतात प्रसार माध्यमांना चौथा स्तंभ म्हटले जाते . लोकशाही व्यवस्था ज्या चार खांबांवर उभी आहे त्यातील प्रसार माध्यमे हा चौथा स्तंभ आहे . असा हा लोकशाहीतील चौथा स्तंभ अलीकडच्या काळात लोकांच्या विश्वासात पात्र ठरत नव्हता . कारण आजही काहींची अशी समजूत आहे की प्रसार माध्यमातून जे काही प्रसिद्ध  होत असते ते सर्व बरोबर असते असे नाही तर त्यात मीठ मसाला लावून बातम्या दिल्या जातात . असा प्रकार सर्रास जरी होत नसला तरीही प्रसार माध्यमांबाबत जनमानसात जी प्रतिमा आहे ती अशी आहे . त्यात चुकीचे काही आहे असेही म्हणता येत नाही . मात्र सरसकट असा प्रकार होत असतो असेही नाही . कारण अपप्रवृत्ती या सर्वच क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात शिरलेल्या असतात . त्याला प्रसार माध्यमेही अपवाद नाहीत . मात्र तरीही जेव्हा प्रसार माध्यमांच्या विश्वासार्हतेतच प्रश्न येतो तेव्हा उलट सुलट मते मांडली जातात . मात्र जेव्हा याबाबत सर्वे केला जातो आणि त्यातून जी माहिती समोर येते ती महत्वाची ठरत असते . त्यात अनेकांची मते जाणून घेतली जातात . त्यानंतर ती माहिती जाहीर केली जाते . आताही अशी माहिती जाहीर झाली असून भारतीय प्रसार माध्यमे आपली विश्वासार्हतात टिकवून आहेत अशी ती माहिती आहे . ही बाब निश्चित समाधानकारक तर आहेच पण भूषणावह अशीही आहे . कारण यात भारताने म्हणजे भारतीय प्रसार माध्यमांनी अमेरिकेला मागे टाकले आहे तसेही त्यात नमूद करण्यात आले आहे . भारत जेव्हा अमेरिकेसारख्या देशाला एखाद्या विषयात मागे टाकतो तेव्हा आपली छाती गर्व आणि अभिमानाने निश्चित फुलून येते . आताही हा प्रकार घडला आहे . कारण रॉयटर्स इन्स्टिट्युट फॉर स्टडी ऑफ जर्नालिझमच्या या वर्षीच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या सर्वेक्षणातून काढलेले निष्कर्ष या अहवालामधून जाहीर करण्यात आले आहेत. बातम्यांवरच्या विश्वासाचे  सरासरी प्रमाण जगभरातच वाढले  आहे. भारतातले केवळ ३८ टक्के लोक म्हणाले की त्यांना ऑनलाईन बातम्यांवर पूर्णपणे विश्वास आहे. भारतात अजूनही सगळ्यात जास्त विश्वास वर्तमानपत्र आणि सरकारी बातम्यांवरच आहे. बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत फिनलँडचा पहिला नंबर लागतो तर अमेरिका विश्वासार्हतेच्या बाबतीत सर्वात खाली आहे. अर्थात याबाबत अजूनही खूप काही करता येणे शक्य आहे . कारण अलीकडच्या काळात भारतातील प्रसार माध्यमांची विश्वासार्हता खूपच खालावली होती . त्यात सरकारची तळी उचलून धरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात होते . त्यात इलेट्रॉनिक प्रसार माध्यमांचा मोठा सहभाग आहे हे उघड आहे . कारण ही माध्यमे पक्षपाती धोरण अवलंबतात असा आरोप उघडपणे केला जात होता . त्यातून बोध घेत काहींनी आपल्या धोरणात बदल आणि सुधारणा केली . त्यामुळे लोक अशा माध्यमांकडे पुन्हा वळले . नाही तर लोकांची पाठ फिरवली तर काय घडू शकते याची या माध्यमांना जाणीव झाली होतीच . त्यातून जनतेची सहानुभूती जर मिळवायची असेल तर आपली विश्वासार्हता वाढवली पाहिजे याची जाणीव त्यांना झाली असल्याने हा बदल घडला आहे . मात्र पूर्वीपासून मुद्रित प्रसार माध्यमांनी आपली जी विश्वासर्गता ठेवली होती ती कायम राखली हेही विसरता येणार नाही .

Leave A Reply

Your email address will not be published.